E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
आयपीएल गाजवणारे एमपीएलचे शिलेदार
Samruddhi Dhayagude
27 May 2025
पुणे : महाराष्ट्र प्रीमियर लीगची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या नियोजनाने होत असलेली ही स्पर्धा सलग तिसर्या वर्षी खेळली जाईल. एमपीएल २०२३ व एमपीएल २०२४ यशस्वी ठरल्यानंतर सर्वांना तिसर्या हंगामाचे वेध लागले आहेत. एमपीएल २०२५ मध्ये असे काही खेळाडू आहेत जे सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२५ मध्ये सहभागी झाले झालेले. एमपीएल २०२५ मध्ये सामील होणारे सर्वात मोठे नाव निर्विवादपणे ऋतुराज गायकवाड याचे आहे. ऋतुराज मागील ६ वर्षापासून आयपीएलमध्ये सहभागी होतोय. तसेच एमपीएलच्या तिसर्या हंगामातही तो पुणेरी बाप्पा संघाचे नेतृत्व करणार आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार असलेला ऋतुराज हा आयपीएलमध्ये दुखापतग्रस्त झाल्याने केवळ ५ सामने खेळू शकला. यामध्ये त्याने दोन अर्धशतकांसह १२२ धावा केलेल्या. एमपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना ऋतुराज उपलब्ध नसला तरी, अखेरच्या टप्प्यात पुणेरी बाप्पा संघासाठी त्याची कामगिरी निर्णय ठरू शकते.
चेन्नई सुपर किंग्स संघासाठीच खेळणारा महाराष्ट्राचा माजी कर्णधार व सलामीवीर राहुल त्रिपाठी हा देखील एमपीएल खेळताना दिसेल. पहिल्या हंगामात नाशिक तर दुसर्या व तिसर्या हंगामात तो पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाचे नेतृत्व करेल. राहुल याच्यासाठी आयपीएल २०२५ तितकी खास राहिली नाही. त्याला चेन्नईसाठी पाच सामने खेळण्याची संधी मिळाली. मात्र, तो केवळ ५५ धावा करू शकला. यापूर्वी त्याने रायझिंग पुणे सुपरजायंट्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्तान रॉयल्स व सनरायझर्स हैदराबाद संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.
आयपीएल २०२५ च्या संग्रामात मैदानावर उतरण्याची संधी मिळालेला मुकेश चौधरी महाराष्ट्राचा तिसरा वेगवान गोलंदाज होता. ऋतुराज व राहुल प्रमाणेच तो देखील चेन्नई सुपर किंग संघाचा भाग होता. मुकेश याला हंगामात फक्त दोन सामने खेळायला मिळाले. यामध्ये त्याने केवळ एक बळी मिळवला. असे असले तरी २०२२ मध्ये आपल्या पहिल्या हंगामात खेळताना त्याने १६ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलेला. यावर्षी तो पुन्हा एकदा ईगल नाशिक टायटन्स संघासाठी खेळताना दिसणार आहे.
आयपीएल २०२५ च्या रणधुमाळीत महाराष्ट्राचे आणखी तीन खेळाडू सहभागी झाले होते. ते खेळाडू एमपीएल २०२५ मध्ये देखील दिसणार आहेत. यापैकी रामकृष्ण घोष हा चेन्नई संघाचाच भाग होता. मात्र, चेन्नई संघ आता स्पर्धेतून बाहेर पडल्याने त्याला आपले आयपीएल पदार्पण करता येणार नाही.
चेन्नईसाठी खेळणार्या या चार खेळाडूंव्यतिरिक्त महाराष्ट्राचे दोन अष्टपैलू खेळाडू अर्शिन कुलकर्णी व राजवर्धन हंगरगेकर हे लखनऊ सुपरजायंट्स संघाचा भाग आहेत. राजवर्धन आयपीएल २०२३ व २०२४ मध्ये चेन्नई संघासाठी काही सामने खेळलेला आहे. तर, अर्शिनने मागील वर्षी लखनऊसाठीच आयपीएल पदार्पण केले होते. मात्र, आयपीएल २०२५ मध्ये त्यांना अद्याप एकही सामना खेळायची संधी मिळाली नाही. लखनऊ संघाचा अखेरचा साखळी सामना शिल्लक असल्याने, कदाचित या दोघांना संधी मिळू शकते.
Related
Articles
कोरोनाचे आणखी एक हजार रुग्ण
02 Jun 2025
महापालिकेच्या जलतरण तलावाच्या खासगीकरणाचा सपाटा
05 Jun 2025
’एआय’च्या माध्यमातून चार दिवसात ३४७ जणांवर कारवाई
03 Jun 2025
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?
01 Jun 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात
03 Jun 2025
कोरोनाचे आणखी एक हजार रुग्ण
02 Jun 2025
महापालिकेच्या जलतरण तलावाच्या खासगीकरणाचा सपाटा
05 Jun 2025
’एआय’च्या माध्यमातून चार दिवसात ३४७ जणांवर कारवाई
03 Jun 2025
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?
01 Jun 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात
03 Jun 2025
कोरोनाचे आणखी एक हजार रुग्ण
02 Jun 2025
महापालिकेच्या जलतरण तलावाच्या खासगीकरणाचा सपाटा
05 Jun 2025
’एआय’च्या माध्यमातून चार दिवसात ३४७ जणांवर कारवाई
03 Jun 2025
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?
01 Jun 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात
03 Jun 2025
कोरोनाचे आणखी एक हजार रुग्ण
02 Jun 2025
महापालिकेच्या जलतरण तलावाच्या खासगीकरणाचा सपाटा
05 Jun 2025
’एआय’च्या माध्यमातून चार दिवसात ३४७ जणांवर कारवाई
03 Jun 2025
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?
01 Jun 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर